#संग्रहालय अध्यक्ष 2023
Explore tagged Tumblr posts
freejobalert1 · 1 year ago
Text
RPSC Curator Recruitment 2023
RPSC Curator Recruitment 2023 : आरपीएससी संग्रहालय अध्यक्ष भर्ती 2023 का नोटिफिकेशन 9 पदों पर जारी किया गया है। इसमें सामान्य वर्ग के लिए 3 पद ओबीसी के लिए 3 पद ईडब्ल्यूएस के लिए 1 पद, एससी के लिए 1 पद और एसटी के लिए भी 1 पद रखा गया है। आरपीएससी संग्रहालय अध्यक्ष भर्ती 2023 के लिए ऑनलाइन आवेदन 26 जुलाई 2023 से शुरू होंगे। RPSC Curator Recruitment 2023 के लिए ऑनलाइन आवेदन की अंतिम तिथि 25 अगस्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 18 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 18 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. घटनापीठानं सुनावणीनंतर याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. या निकालामुळे तामिळनाडू मधल्या जलीकट्टू आणि महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती, मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्याबाबत ही सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत समाधानी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
***
देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो २०२३ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ४७ व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त त्यांनी नागरीकांना शुभेच्छा दिल्या. स्थानिक आणि ग्रामीण संग्रहालयं बांधण्यावर सरकारचा भर असल्याचं पंतप्रधान म्हणाले. इंटरनॅशनल म्युझियम एक्स्पोचे शुभंकर, भारतीय संग्रहालयांची निर्देशिका, कर्तव्य पथचा पॉकेट मॅप आणि म्युझियम कार्ड्सचं अनावरण यावेळी करण्यात आलं.
***
केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचं खातं बदललं असून, त्यांच्याकडे भू विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कायदा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 
***
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन तहव्वूर राणा याच्या प्रत्यर्पणाला अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथल्या न्यायालयानं मंजूरी दिली आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या राणाच्या भुमिकेसाठी भारतानं केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरुन त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. भारतानं त्याच्यावर दहशतवादी कृत्ये करण्याचा कट रचणं, युद्ध पुकारणं, खून करणं आणि इतर आरोप ठेवले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकारामुळे राणा याच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाल्याचं राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
***
राज्यातल्या मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या चिंताजनक असल्याचं, विधानप��िषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी योग्य ती पावलं उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं कराव्यात, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत, तर जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान राज्यातून सुमारे पाच हजार ५१० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी ही चिंताजनक बाब असल्याचं दानवे यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
***
केंद्र आणि राज्य शासनाच्या बांबू मिशन योजनेसाठी राज्यातल्या लातूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आल्याची माहिती, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र बांबू समितीचे सदस्य पाशा पटेल यांनी दिली. ते काल सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात २७ हजार ५०० हेक्टर जागेवर बांबूची लागवड करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात बांबू मिशन राबवणार असल्याचं पटेल यावेळी म्हणाले.
***
हिंगोली जिल्ह्यात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर "स्त्री शक्ती समाधान शिबीरं’ होत आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना देण्यासाठी तसंच त्यांच्या समस्यांचं निराकरण करणारं स्थानिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
***
औरंगाबाद इथं नव्यानं निर्माण केलेल्या हर्सुल टी पॉइंट इथल्या चौकात राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी या मागणीचं निवेदन सादर केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करुन यासंबंधीचे आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार या योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांनी संबंधित विभागांकडे प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन, जिल्हास्तरीय समितीनं केलं आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थाना यंत्रसामुग्री आणि इंधन या दोन्हींचा खर्च देणं प्रस्तावित आहे. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इंधनासाठी अनुदान दिलं जाणार आहे.
//***********//
0 notes